शिंदखेडा महाविद्यालयात ग्राहक पंधरवड्यानिमीत्त वक्तृत्व स्पर्धा

0

शिंदखेडा । येथील एम. एच. एस. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ग्राहक पंधरवड्या निमीत्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत हायस्कूलचा प्रसाद कोळपकर व महाविद्यालयतील योगेश बडगुजर हे प्रथम आले. आहे. अध्यक्षस्थानी प्राचार्य डि. सी. गिरासे होते. लहान 8ते 10 च्या गटात ग्राहक संरक्षण कायदा व हक्क आणि क.महाविद्यालयीन गटात ग्राहकांचे शोषण व उपाय हे विषय होते.लहान गटात द्वितीय भागवत गिरासे, तृतीय कुणाल भामरे, वरीष्ठ गटात द्वितीय पुनम बेहर, तृतीय मिनाक्षी शर्मा यांनी यश मिळविले.

प्रा. अजय बोरदे व प्रा. जी. पी. शास्त्री यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.यावेळी माजी प्राचार्य पी. व्हि. दिक्षीत, प्रा.डि. ए. पवार प्रा. पी. टी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कोणतीही वस्तू खरेदी करतांना अधिकृत व्यापार्‍याकडून खरेदी करावी व खरेदी केलेल्या वस्तूची पावती घ्यावी.सेल मधून व ऑनलाईन शॉपींग करतांना ग्राहकांनी जाहिरातीला बळी पडू नये.असे आवाहन मान्यवरांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सी. डी. डागा, सुत्रसंचालन एस. एन. नेरपगार, आभार प्रर्दशन टि. एन. पाटील यांनी केले.