शिंदखेडा – श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तविद्यापीठ अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.नानासाहेब डॉ.विश्र्वासराव पाटील यांच्या स्मरणार्थ 5 ऑक्टोबर रोजी प्रा.अतुल सुर्यवंशी (पाचोरा) यांचे “आधुनिक भारताचा इतिहास “या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील मा विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. शशिकांत बोरसे हे” युवकापुढील आव्हाने” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आणि शिंदखेडा येथील तहसीलदार सुदाम महाजन स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी या विषयी 6 ऑक्टोबर रोजी मार्गदर्शन करणार आहेत.
14 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय ज्ञानगंगा सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच त्यादिवशी व्यक्तीमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उमविचे मानव्यविद्या शाखेचे डीन प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे सचिव प्राचार्य डॉ. मनोहर पाटील हे मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रफुल्ल कुमार सिसोदे, उपाध्यक्ष अशोक पाटील, माजीसभापती प्रा.सुरेश देसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या भव्य कार्यक्रमाना उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.बी.आर.चौधरी, आयोजक डॉ. संभाजी पाटील व अधीक्षक नरेंद्र भामरे यांनी केले आहे.