शिंदखेडा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक सहाय्य

0

शिंदखेडा । येथील मराठा पाटील समाजातर्फे वरपाडे ता शिंदखेडा येथील सुशिक्षित बेरोजगार कै. प्रवीण हिम्मत पवार (वय-42) याने नैराश्यातून 2 जानेवारी 18 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे तो कमावता असल्याने संपूर्ण कुटूंब आर्थिक अडचणीत सापडले म्हणून शिंदखेडा येथील मराठा पाटील समाजाने पुढाकार घेऊन मयताच्या वडील हिम्मत तोताराम पाटील यांना 27 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. यावेळी सुभाष देसले, माजी उपनगराध्यक्ष दीपक देसले, अरुण देसले, प्रा.सतीश पाटील, पत्रकार भिका पाटील,पंकज कौठळकर , रवींद्र पाटील, उमाकांत देसले,नितीन देसले, यांनी वरपाडे येथे जाऊन दिले.

कुटुंबिय झाले भावूक
वरपाडे येथील प्रवीण उर्फ भटू पवार याने नैराश्यातून 2 जानेवारी रोजी आत्महत्या केले मयतास दोन भाऊ, एक बहीण, आई, वडील, पत्नी व 3 वर्षाची लहान मुलगी असून सर्व 11 जणांचे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याने आर्थिक अडचणीत होते. सदर घटना शिंदखेडा येथील मराठा पाटील समाजाच्या जेष्ठ व तुरुंनाना कळली त्या नुसार सुभाष रावसाहेब यांनी सदर घटना समाज बांधवांना सांगितली त्या नुसार सर्वांनी आपआपल्यापरीने आर्थिक मदत केली सदर मदत आज वरपाडे येथे जाऊन दिली या प्रसंगी वरपाडे गावातील नागरिक उपस्थित होते. त्यावेळी सर्वच भावुक होऊन गेले.