शिंदखेडा येथील काँक्रीट रस्त्याची दुर्दशा

0

शिंदखेडा । येथील स्टेशनरोडच्या शिवाजी चौफुली ते भगवा चौफुली दरम्यानच्या काँक्रीटीकरणाचे काम पुढे सुरू असतांनाच केवळ एक महिन्यात मागे केलेल्या कामात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची नागरिकांची तक्रार आल्यानंतर पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी लक्ष घातले. रस्त्याच्या कामाची चौकशी करावी आणि गुणवत्ता नियंत्रकामार्फेत तपासणीचे आदेश दिले. नुकतेच या रस्त्याच चौकशी करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयातील अभियंते आले होते. त्यांनतर मंगळवारी रात्री कंत्राटदाराने रस्त्याच्या ज्या भागात खड्डे पडले होते त्याठिकाणी तात्पुरती डागडुजी सुरू केली आहे.

नागरिकांमध्ये याबाबत सखेद आश्‍चर्य व्यक्त करीत या थातूरमातूर डागडुजीबद्दल तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँक्रीटीकरणाच्या कामातून जागोजागी खडी उखडून मोठे खड्डे तयार होत आहेत. मोठ्या पावसात या रस्त्याची दुर्दशा होणार हे निश्‍चित आहे. अशा परिस्थितीत शिंदखेड्याच्या युवकांनी 19 जून रोजी रस्ता रोको तर 15 ऑगस्ट रोजी आत्मदहानाचा इशारा दिला आहे.