शिंदखेडा येथे ‘आपला दवाखाना आरोग्य योजनेअंतर्गत मंजूर दवाखाना विरदेल रोड परिसरात सुरू करा – स्थानिक नागरिकांची मागणी,,,
शिंदखेडा(प्रतिनिधी) : – विरदेल रोड लगत साईलीला नगर व लक्ष्मी नारायण कॉलोनी परिसरात आपला दवाखाना योजनेअंतर्गत मंजूर दवाखाना सुरू करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , उप मुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र सरकारने मुंबईसह राज्यभरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही योजना सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 700 दवाखाने सुरू केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.त्या अंतर्गत एक दवाखाना शिंदखेडा नगरपंचायत परिसरात मंजूर असून अद्यावत सुरू आहे तर दुसरा दवाखाना मंजूर झाला असून तो दवाखाना विरदेल रोड लगत साईलीला नगर वा लक्ष्मी नारायण कॉलनी परिसरात सुरू करण्यात यावा कारण सदर ठिकाणी लगतच्या परिसरातील साईलीला नगर, साईनगर, लक्ष्मीनारायण कॉलनी,सिंधी कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज चौक,जनता हायस्कूल परिसर,खरेदी विक्री संघ परिसर,नेताजी सुभाष चंद्र बोस नगर, रमाई नगर,विर एकलव्य नगर,आदर्श कॉलनी,बस स्टँड रोड,गणेश कॉलनी या सर्व कॉलनी परिसरातील नागरिकांना सोयीस्कर असून या दवाखान्याचा लाभ मिळू शकतो तरी शासकीय जागेवर किंवा खाजगी जागेवर घर भाडेतत्त्वावर घेऊन सदर दवाखाना साईलीला नगर वा लक्ष्मी नारायण कॉलनी परिसरात विरदेल रोड लगत सुरू करण्यात यावा या आशयाचे निवेदन तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले.यावेळी माजी सैनिक भूषण पवार,गुलाबराव बडगुजर,मुकेश बडगुजर,प्रशांत मराठे,महेंद्र मराठे,भूषण मराठे, बबनराव सकट,गुलाब सोनवणे,संजय उमप उपस्थीत होते.