शिंदखेडा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या वतीने जगात व देशात थैमान घातलेल्या कोरोणा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेले रक्ताची गरज भासणार आहे या पार्श्वभूमीवर आज रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा व जैन अलर्ट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबीर सकाळी दहा ते चार ह्या वेळात घेण्यात आले.सकाळपासुनच जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.शहरातील एकुण शंभर हुन अधिक रक्तदात्यानी रक्तदान केले.यासाठी धुळे येथील नवजीवन ब्लड ग्रुप चे डाॅ.प्रशांत पाटील, डॉक्टर सुनिल चौधरी, रोहिदास जाधव,जुनित खाटिक, सुभाष खैरनार, पांडुरंग गोसावी,पावरा यांनी सहकार्य केले. याकामी रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा चे अध्यक्ष बाळकृष्ण बोरसे, सचिव विक्की चंदनानी, चेअरमन संदीप सोनार,प्रा.जितेद्र परमार, संजयकुमार महाजन,हर्षल अहिरराव, विनोद जैन ,परिक्षीत देशमुख , संदीप पारख ,देवेंद्र नाईक, संदीप गिरासे, प्रदीप शर्मा तसेच जैन अलर्ट संघटना चे अध्यक्ष व भागचंद्र कर्नावट, राज्य सदस्य प्रा.सी.डी.डागा, सचिव हितेंद्र जैन, उपाध्यक्ष विजय बोथरा यांसह सदस्यानी परिश्रम घेतले.
कोराणाबाधित रुग्णाची संख्या देशात व महाराष्ट्रात वाढत असताना त्यावर उपचारासाठी रूग्णांना रक्त आवश्यक आहे म्हणून शहरातील जास्तीत रक्तदात्यानी आम्हाला सहकार्य केले व ते आम्ही जास्तीत जास्त रक्त पिशव्या शासनाला मदत म्हणुन पोहचविण्याचे संकल्प केला आहे.आम्हास शहरातील रक्तदात्यांनी प्रंचड प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानले अशा प्रतिक्रिया रोटरी क्लब चे अध्यक्ष बाळकृष्ण बोरसे, संदीप सोनार व जैन अलर्ट चे प्रा.सी.डी.डागा यांनी दिली.