शिंदखेडा येथे जैन अल्पसंख्याक कार्यशाळा

0

शिंदखेडा । येथील बिजासनी मंगल कार्यालयात जैन अल्पसंख्याक कार्यशाळा उत्साहात पार पाडली. या कार्यशाळेचे आयोजन भारतीय जैन संघटनेने केले होते. अकोला येथील प्रशिक्षक कुशल बलदोटा (एल.एल.एम)यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी श्रीसंघचे अध्यक्ष खुशालचंद ओस्तवाल होते.प्रास्ताविक प्रा. सी. डी. डागा तर सूत्र संचालन संजय पारख यांनी केले. ता.16तेे18च्या दरम्यान शहादा (तेरापंथी भवन),नंदुरबार(डी एस के होटल),अक्कलकुँवा(जैन धर्म शाळा),दोंडाईचा(व्यापारी भवन), शिरपुर (नवीन जैन स्थानक) मध्येही अशा प्रकारची कार्यशाळा अयोजित केली गेली.

लाभाबाबत दिली माहिती
जैन समाजाला केंद्र सरकारचा धर्माच्या आधारावर 27 जुलाई 2014 ला अल्पसंख्याक दर्जा प्रदान केला गेला. काही राज्यात 2004 पासूनच जैन समाजला हा दर्जा प्राप्त होता. जैन अल्पसंख्याकचा कोणताही प्रकारचा प्रमाणपत्र मिळत नाही. केवळ शाळा सोडल्याचा दाखल्यावर जैन असने आवश्यक. जर तसे नसेल तर, कोरे कागदावर 10 रुपयाचे कोर्ट फी स्टैम्प लावून, मी जैन असल्याचे लिहून सही करावी. अथवा पर मंदिर ट्रस्टच्या लेटर हेड वर ही व्यक्ति जैन असल्याचे लिहावे. कुशल बलदोटा यांनी जैन अल्पसंख्याक विद्यार्थी, महिला, व्यापारी, शे.संस्था, धार्मिकस्थळ आदि बाबत मिळणार्‍या लाभाची मााहिती दिली. विभागिय अध्यक्ष दिलीप कांकरिया, विभगिय साचिव प्रा.चंद्रकांत डागा यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाअध्यक्ष अशोक कुचेेेरीया, आशीष चोरडिया, अशोक कोटडिया, रविन्द्र टाटिया, जितेंद्र चतुरमुथा, निखिल रुणवाल, सचिन गुजराथी, राजेन्द्र पारख, विजय बाफना, हितेंद्र जैन आदिने परीश्रम केले.