शिंदखेडा । शहरातील सूर्यवंशी मराठा समाजाच्या वतीने यंदा 11 व्या वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारसह मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 9 रूग्णांना 5 लाख रूपयांचा मदतनिधी तसेच शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 517 महिलांना अनुदान वाटप कार्यक्रमाचे आयोजन मराठा मंगल कार्यालयात करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, माजी आ.रामकृष्ण पाटील, सभापती प्रा.सुरेश देसले, नगरपंचायतीचे गटनेते अनिल वानखेडे, नगराध्यक्ष मथुराबाई मराठे, उपनगराध्यक्ष उल्हासराव देशमुख यांच्यासह तेली समाज अध्यक्ष जगन्नाथ चौधरी, पाटील समाज अध्यक्ष मुरलीधर देसले, मराठा समाज अध्यक्ष जयदेव मराठे, बडगुजर समाज अध्यक्ष दिलीप बडगुजर, गाडी लोहार समाज अध्यक्ष सुकलाल लोहार, माळी समाज अध्यक्ष प्रवीण राजाराम माळी, आदिवासी एकता समाज अध्यक्ष दीपक अहिरे आदी उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला दलित मित्र मंडळ, दिगंबर पाटोळे, दशाम गोसावी समाज अध्यक्ष किरणगीर महंत, भोई समाजाचे अध्यक्ष अशोक मोरे, साठ घर मुस्लीम पंच कमेटीचे अध्यक्ष फरीद खान पठाण, सुवर्णकार समाज अध्यक्ष स्वप्निल सोनार, शिंपी समाज अध्यक्ष जयवंत शिंपी, जैन अलर्ट ग्रुप अध्यक्ष कल्पेश जैन, नाभिक समाज अध्यक्ष हेमंत चित्ते, चर्मकार समाज अध्यक्ष यादवराव सावंत, आदी विविध समाजाचे अध्यक्ष उपस्थित होते.
विविध समाजाचे अध्यक्ष उपस्थित
शहरातील मराठा समाजातील छत्रपती शिवाजी एज्युकेशन आणि कल्चरल संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विनायक पवार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा महेंद्र मराठे यांनी केले. कार्यक्रमास गुलाबराव बडगुजर, रवींद्र बडगुज, भरत मराठे, भगवान मराठे, प्रभाकर मराठे, प्रवीण मराठे, श्रावण मराठे, आनंद मराठे, यशवंत पवार, रमेश मराठे, अॅड.एन.बी.मराठे, महेंद्र मराठे, यादव मराठे, रामदास मराठे आदी उपस्थित होते.
निराधार योजनेचे लाभार्थी
शासनाच्या निराधार अनुदान योजनेअंतर्गत 517 लाभार्थ्यांना नगर पंचायतीचे गटनेते अनिल वानखेडे यांच्या हस्ते शासन मदतीचे पत्र वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यात निधीतून ललित मराठे 50 हजार, रमेश मराठे 80 हजार, भिका बडगुजर 50 हजार, पूजा वडर 55 हजार, लताबाई बडगुजर 17 हजार 500, बिना पठाण 25 हजार, कमरान तंबोली 62 हजार, दिपक चौधरी 80 हजार असे एकूण 7 लाख 50 हजार रूपयांचा मदत निधी वाटण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष मथुराबाई मराठे, उपनगराध्यक्ष उल्हासराव देशमुख यांचा नागरी सत्कार करण्यात आला.