शिंदखेडा येथे ‘युवकांचे वर्तन’ विषयावर व्याख्यान

0

शिंदखेडा। येथील एम.एच.एस.एस.कनिष्ठ महाविद्यालयात भितीयुक्त वातावरणात युवकांचे वर्तन या विषयावर प्रा.दिपक माळी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.सी.गिरासे होते. प्रास्ताविक प्रा.संदीप गिरासे यांनी केले.

गेल्या आठवड्यात जिल्ह्याच्या ठिकाणी झालेल्या कुख्यात गुंड गुड्ड्या हत्त्याकांडानंतर युवकांनी आपले वर्तन कसे ठेवावे याविषयी प्रा.माळी यांनी मार्गदर्शन केले. वाईट बाबींचे समर्थन कधीच करू नये. अभ्यासाकडे लक्ष द्यावे, कुमार अवस्थेतून युवा अवस्थेत जाणारी व्यक्ती नेतृत्वक्षम होण्याचा प्रयत्न करतो. त्याचा योग्य वापर करावा, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात गिरासे यांनी आपली भूमिका मांडली. आभार प्रा.चंद्रकांत डागा यांनी मानले.