शिंदखेडा येथे रेशन दुकानदार संघटनेचा मेळावा

0

निजामपूर । धुळे जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ राँकेल परवाना धारक यांचा जिल्हा मेळावा आशापुरी देवी मंदिर परिसर शिदखेडा येथे 2 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त संख्येने दुकानदारानी उपस्थितीत रहावे असे आवाहन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व राज्य संघटनेचे सचिव गुलाबराव नांद्रे यांनी केले आहे. तत्पूर्वी नंदुरबार जिल्ह्यायाचा मेळावा 1 सप्टेंबर रोजी शहादा येथे होणार असून त्या मेळाव्यात देखील धुळे जिल्ह्यातुन जास्तीत जास्त उपस्थिती रहाणार आहे. महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटनेचे राज्याधयक्ष डी एन पाटील, उपाध्यक्ष राजेश अबुसकर (बुलढाणा) व त्यांचे सहकारी 29 व 30 रोजी दिल्लीत मंत्रीगटाशी चर्चा करणार आहे. 1 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे व धुळे जिल्ह्यातील 2 सषटेबर रोजी शिदखेडा येथे दिल्लीतील निर्णयाची माहिती देणार आहेत. मेळाव्यास उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष प्रविण खैरनार शिरपुर तालुका अध्यक्ष राजु टेलर शिदखेडा तालुका अध्यक्ष भाईदास पाटील, तालुका अध्यक्ष मधुकर पाटील यांनी केले आहे.