शिंदखेडा..
येथील पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेतर्फे माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील निवडक माध्यमिक शिक्षीकांचे शिबिर सोमवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी तर शिक्षकांचे शिबिर बुधवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी आयोजित केले आहे.
शिंदखेडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सहकारी पतसंस्थेच्या शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर सभागृहात सकाळी अकरा ते पाच या वेळेत हे शिबिर होणार आहे. निवड झालेल्या शिक्षकांनी या शिबिरात पूर्णवेळ उपस्थित राहून सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी डॉ सी के पाटील यांनी केले आहे.
आयोजनासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा परेश शाह, शाखा अध्यक्ष मनोहर भोजवाणी, कार्याध्यक्ष प्रा दिपक माळी, सचिव भिका पाटील, शिबिर संयोजक सुरेश बोरसे, प्रा संदीप गिरासे, प्रा अजय बोरदे, प्रा सतिश पाटील, देवेंद्र नाईक , पतसंस्थेचे व्यवस्थापक आणि कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
या शिबिरात वैज्ञानिक दृष्टीकोन आणि शिक्षकाची भूमिका, स्रीया आणि अंधश्रद्धा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची व्यापक वैचारिक भूमिका, चमत्कारातील प्रयोग या विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली आहेत.