शिंदखेडा राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना भाजपा कार्यकर्ते कडून जिवे मारण्याची धमकी दिली यासाठी पोलिस स्टेशन ला निवेदन
शिंदखेडा ( प्रतिनिधी ):– आज रोजी देशाचे नेते राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांना अमरावतीचा भाजपाचा कार्यकर्ता सौरभ पिंपळकर यांने जिवे ठार मारण्याची धमकी दिली व भाजपाचे निलेश राणे यांनी पवार साहेबांवर खालच्या भाषेत टिका करत प्रक्षभोक भाषा वापरत दोंन्ही व्यक्तीची क्रुत्य देशासाठी राज्यासाठी समाजासाठी घातक असुन समाजीक शांतता भंग करून अराजकता माजविणारी व गुन्हेगारी प्रव्रुतीला मदत करणारी असुन आपण कायद्याप्रमाने सदर व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाही करावी असे निवेदन शिंदखेडा पोलीस स्टेशन ला देण्यात आले या प्रसंगी धुळे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष निखील पाटील युवक तालुकाध्यक्ष मिलींद देसले ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष दिपक जगताप युवक जिल्हा सचीव कपील पाटील शहराध्यक्ष गोलू देसले ग्रंथालय सेलचे तालुकाध्यक्ष हर्षदिप वेंदे नरेश कोळी शाम पाटील अशोक बैसाने आदी पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते