शिंदखेडा रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या

0

शिंदखेडा। येथील रेल्वे स्थानकावर ताप्ती गंगा , नवजीवन, प्रेरणा, बिकानेर या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा यासाठी रेल्वे संघर्ष समितीचे शिष्ट मंडळ आज 29जुलै रोजी केंद्रिय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची धुळे येथे भेट घेवून हा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा या आशयाचे निवेदन देणार आहे.

शिंदखेडा रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी सलिम नोमानी व संघर्ष समितीचे सर्व सदस्य गेल्या पंधरा वर्षापासून पाठपूरावा करीत आहेत. परंतू अद्यापही हा प्रश्न प्रलंबितच आहे. रेल्वेमंत्र्यांच्या या आगमनाची संधी साधून प्रवासी संघर्ष समितीचे पदाधिकारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेणार आहे. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सलीम नोमानी यांच्यासह रविंद्र लखोटे, सुभाष तलवारे, राजेंद्र पाटिल, राजेश इश्वरलाल शाह, प्रेमराज मराठे, मोहन परदेशी, चंद्रकांत गोधवानी, यांच्यासह पदाधिकार्‍यांचे शिष्टमंडळ रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार आहे.