शिंदखेडा । रोटरॅक्ट क्लब ऑफ शिदखेडा यांचा दहावा पदवीदान समारंभ वैभव व्यास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. नुतन अध्यक्षपदी रो.हर्षल भामरे व सेक्रेटरीपदी रो.रणजीत गिरासे यांनी शपथ घेतली. येथील बिजासनी मंगल कार्यालयात झालेल्या पदवीदान समारंभास श्रीकांत इंदानी ,हर्षकाल अहिरराव, स्वप्नील गौंड, संदिप गिरासे, महेंद्र पाटील प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
शहरात कचर्याचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे. यामूळे ओला व सूका कचरा वेग- वेगळा गोळा करावा व त्याची विल्हेवाट लावतांना कोणती काळजी घ्यावी या विषयी नागरीकांमध्ये जनजागृती करण्याबाबत कार्यक्रम हाती घेणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष हर्षल भामरे यांनी दिली. शहरातील रोटरॅक्ट क्लबने विविध समाजपयोगी कामे केली असून गावाच्या विकासात आपले योगदान दिले आहे असे गौरव उदगार वैभव व्यास यांनी काढले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला पाहूण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आल.व आगामी वर्षात शंभर झाडे लावण्याचा व संगोपनाचा संकल्प करण्यात आला.
विक्रम यांस घेतले दत्तक
नुतन सचिव रणजित गिरासे यांच्या शेतात कामाला असलेल्या रमेश पावरा यांचा मुलगा विक्रम यांस रोटरॅक्ट ने दत्तक घेतले आहे. विक्रमचे वडील हे गिरासेंकडे वीस वर्षापासून सालदारकी करीत आहेत. विक्रम हा शिंदखेडा येथिल उज्वल प्राथमिक शाळेत इ.3 री इयत्तेत शिक्षण घेत आहे. पुढील तीन वषार्ंपर्यंत त्याचा शिक्षणाचा खर्च रोटरॅक्ट करणार आहे. पदवीदान समारंभात गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.