शिंदखेडा (प्रतिनिधी)-शहरातील स्टेशन रोड भागात एस एस व्ही पी एस महाविद्यालयाच्या समोर होंडा कंपनीचे वीरा होंडा हे नवीन दुचाकी शोरूमचे उद्घाटन शिंदखेडा नगरपंचायतीचे सभागृह नेते अनिल वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. या शोरूमचे मालक प्रणव विसपुते व हर्षाली सागर बागुल हे आहेत. या शोरूममध्ये होंडा कंपनीच्या सर्व प्रकारच्या दुचाकी ग्राहकांसाठी विक्रीस उपलब्ध आहेत.यावेळी रविंद्र बागुल, कृष्णा ज्वेलर्सचे मालक प्रा.सोमनाथ अहिरराव, अभिषेक ज्वेलर्सचे किशोर अहिरराव, लक्ष्मीनारायण ज्वेलर्स भरत अहिरराव उपस्थित होते.