शिंदखेडा। येथील शिवाजी चौफुली ते भगवा चौफुलीदरम्यान करण्यात आलेले काँक्रीटीकरण अतिशय निष्कृष्ट दर्जांचे झाले आहे. या रस्त्याचे नव्याने दुरूस्ती करण्यात यावी या कामातील भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदाराची चौकशी करून कारवाई करण्यची मागणी तरूणांनी तहसिलदारांना दिले. आपल्या रास्त मागण्या मान्य झाल्या नाहीत तर टप्प्या टप्प्याने जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनचा पहिला टप्प्यात 19 जून रोजी रास्ता रोको आंदोलन तर शेवटच्या टप्प्यात 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याची तक्रार
या काँक्रीटीकरणामध्ये भगवा चौक ते बस स्टँडपर्यंतच्या रस्त्यावरील खडी एका महिन्यात उखडली आहे. आतापासूनच मोठे खड्डे पडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असतांना एका रात्रीतून जनता चौफुली आणि कचेरी चौंकातील रस्ता करण्यात आला. या दरम्यान खडी सिमेंट, लोखंड याचे कोणतेही गणिती ताळमेळ नसल्याचा आरोप करण्यात आला. रस्त्याचे काम निष्कृष्टपाचे असल्याचे खुद्द लोकप्रतिनिधींचेच मत असतांना या पुढार्यांची मती काम सुरू असतांना कुठे गेली होती असा प्रश्न विचारला जात आहे.
पुढार्यांनी पाकीटे घेतली
याशिवाय रस्त्याच्या कामात ओरडू ये म्हणून तुमच्या गावातील 22 पुढार्यांना पाकीटे दिल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकार्यांने जाहीरपणे सांगितले. यासर्व घटनांचा परिपाक म्हणून गावातील युवक चवताळले असून रस्त्याची दुरूस्ती होई पर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये सर्व पक्षीय तरूण कार्यकर्त्यांचा समावेश आहे. भाजपा शहराध्यक्ष दिनेश सुर्यवंशी, आदिवासी एकता परिषदेचे जिल्हासचिव दिपक अहिरे, रोहीत कौठळकर, सूरज देसले, रवि देसले, श्रावण माळी, डॉ. आकाश पवार, अजय पवार, मिलींद पाटोळे यांच्यासह गावातील 60 युवकांच्या निवेदनावर सह्या आहेत.