शिंदखेड्याचे लाचखोर पोलीस निरीक्षक देवीदास भोज निलंबीत

0

धुळे । शिंदखेडा पोलीस ठाण्याचा लाचखोर पोलीस निरीक्षक देवीदास भोज याला लाच प्रकरणात निलंबीत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी दिली. निरीक्षक भोज हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून धुळे जिल्हा कारागृहात आहे. शेवाळी ता.शिंदखेडा येथील तक्रारदारावर शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्यात आले आहे. त्या गुन्ह्यात मदत करणे आणि दोषारोपपत्रांच्या झेरॉक्स प्रती देण्यासाठी निरीक्षक देवीदास भोज याने तक्रारदाराकडे एक हजार 500 रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणात लाच घेतांना निरीक्षक भोज याला अटक झाली होती. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी निरीक्षक भोज याच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठकांकडे पाठविला होता. तो प्रस्ताव मंजूर झाल्याने एसपी. एम.रामकुमार यांनी लाचखोर भोजला निलंबीत केले. भोजची कारकीर्द ही अगोदरपासूनच वादग्रस्त होती.