८४ वर्षाच्या शेतकऱ्याची प्रकृती गंभीर
मुंबई :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील धर्मा पाटील या ८० वर्षीय शेतकऱ्याने विष घेऊन मंत्रालयात सोमवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी तातडीने या शेतकऱ्याला जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात शेतकऱ्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात या शेतकऱ्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्या बाबत धर्मा पाटील यांनी गेले तीन महिन्यापासून पाठपुरावा सुरू केला होता. मात्र, त्यांना लवकर भरपाई मिळू न शकल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे.
सोमवारी रात्री उशीरा मंत्रालयाच्या परिसरात धर्मा पाटील या वयोवृद्ध शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. औष्णिक प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीला अल्प मोबदला मिळाल्याने त्यांनी सोमवारी १० च्या सुमारास मंत्रालयाच्या समोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. पाटील यांची पाच एकर जमीन औष्णिक प्रकल्पासाठी संपादित झाली आहे. जमिनीचा पाचपट मोबदला देण्याचे सरकारचे धोरण असताना पाच एकरसाठी केवळ चार लाख रुपये मोबदला त्यांना देण्यात आले आहे. वाढीव मोबदला मिळावा यासाठी पाटील हे गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे मारत होते. तिथे काहीच दाद न मिळाल्याने त्यांनी काल सोमवारी मंत्रालय गाठले.
मंत्रालयात फेऱ्या मारूनही काम होत नाही हे पाहून निराश झालेल्या धर्मा पाटील यांन विषारी द्रव्य प्राशन केले. पाटील यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसताच पोलीसांनी १०८ क्रमांकाची रुग्ण्वाहिका सेवेला बोलावून त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सध्या ८४ वर्षीय धर्मा पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याचे रूग्णालयातील सुत्रांनी सांगितले. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे डीन डॉ. ननदकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. उपचाराचा खर्च शेतकर्याच्या मुलाला का करावा लागत आहे, अशी विचारणा विखे पाटील यांनी केली शेतकरी धर्मा पाटील यांच्या तपासण्या बाहेर का कराव्या लागल्या, याची तातडीने माहिती घेण्याचे डॉ. ननदकर यांनी विखे पाटील यांनी आश्वासन दिले.
-धर्म पाटील यांना मदत दिलीय:- सरकारचा खुलासा
धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या ८४ वयाच्या शेतक-याने आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्यानंतर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला आहे. या शेतक-याने नुकसान भरपाईची रक्कम २.१८ लाख इतकी आहे व ही रक्कम सदर शेतकऱ्याने १३/०४/२०१७ रोजी स्वीकारलेली असून, महानिर्मितीमार्फत १० लाख प्रति हेक्टर दर व जानेवारी २०१२ पासून व्याजाच्या शासकीय दरानुसार एकूण व्याज असा जमिनीचा दर धरुन जमिनीचा मोबदला देणे विचाराधीन आहे असे यामध्ये म्हटले आहे. वृत्ताची पार्श्वभूमी लक्षात घेऊन महानिर्मितीने यासंदर्भात वस्तुस्थितीवर आधारित तातडीचा खुलासा केला आहे. सदर जमिनीचा मोबदला देणेसंबंधी अंतिम निवाडा जिल्हाधिकारी, धुळे यांचेमार्फत झालेला आहे. सदर निवाड्याप्रमाणे जमिनीचा मोबदला रक्कम महानिर्मितीमार्फत भूसंपादन अधिकारी यांचेकडे जमा करण्यात आली आहे. धर्मा मांगा पाटील यांच्या मालकीचे मौजे विखरण येथील जमीन गट क्र. २९१/२ अ चे क्षेत्र १.०४ हेक्टर शेत प्रस्ताव क्र. ७/२००९ मध्ये समाविष्ट आहे. या प्रस्तावाचा निवाडा दि. १७/०३/२०१५ रोजी झालेला असून, निवाड्याप्रमाणे जमीन नुकसानभरपाईची रक्कम २.१८ लाख इतकी आहे व ही रक्कम सदर शेतकऱ्याने दि. १३/०४/२०१७ रोजी स्वीकारलेली असून, महानिर्मितीमार्फत १० लाख प्रति हेक्टर दर व जानेवारी २०१२ पासून व्याजाच्या शासकीय दरानुसार एकूण व्याज असा जमिनीचा दर धरुन जमिनीचा मोबदला देणे विचाराधीन आहे असे शेवटी या खुलाश्यात स्पष्ट करण्यात आले आहे.