शिंदखेड्यातील श्रीराम दोरखंड या दुकानाला आग

0

शिंदखेडा । शिंदखेडा येथील भगवा चौकात असलेल्या श्रीराम दोरखंड या दूकानाला आज पहाटे 5-6 वाजेच्या दरम्यान आग लागली. या आगीत दूकान साहित्यासह पूर्णपणे जळून खाक झाले. सुमारे दोन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग लागल्याचे नेमके कारण कळू शकले नाही मात्र शॉटशर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज आहे. येथील भगवा चौकात गेल्या एक वर्षापासून श्रीराम दोरखंड नावाचे दुकान आहे. तूकाराम नाना खरोळे हे या ठिकाणी दोरी विक्रीचा व्यवसाय करतात. रात्री नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले. आज पहाटे सकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास आगीचे लोळ उठल्याने आग लागल्याचे या भागात असलेल्या नळावर पाणी भरणार्‍या काही महिलांचे लक्षात आले. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रविण माळी यांना माहिती दिली. तोपर्यंत आगीने चांगलाच पेट घेतला होता.

घटनास्थळी अग्निशमन गाडी दाखल
युवराज माळी, प्रविण माळी, भूषण चौधरी, फिरोज तेली यांनी घटनास्थळी धाव घेतली व अग्नीशमन दलाच्या गाडीला पाचारण केले. आग अधिक पसरू नये यासाठी उपलब्ध पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. काहि वेळातच अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचली व आग पूर्णपणे आटोक्यात आली.मात्र तोपर्यंत दूकान पूर्णपणे आगीत भस्म झाले होते.दूकानाला आग लागल्याचे प्रविण माळी यांनी दूकानाचे मालक खरोळे यांना दूरध्वनीवरून कळविले.तेही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दूकानात असलेले दोर्‍यांचे रीळ व इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा आगीत जळून खाक झाला आहे. या दूकानाच्या शेजारी असलेल्या दोन इलेक्ट्रॉनीक्स दूकानांचे देखील किरकोळ नुकसान झाले आहे. या भागात मोठे शॉपींग सेंटर आहेत. भागात दुकानांना विद्युत खाबांवरील तारा दुकानांच्या छतावरून गेल्या आहेत.त्या अधिक धोकादायक आहेत.या विद्युत तारांच्या घर्षणामुळे शॉटशर्किट झाल्याचे बघ्यांचे म्हणणे आहे. गावामध्ये अनेक ठिकाणी विद्युत तारांची हिच अवस्था आहे. त्यामूळे या पूढे अशी दूर्घटना होवू नये यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने अश्या धोकादायक तारांची तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.