शिंदखेडा। शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकिय भूकंप घडविण्यात राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांना यश आले असून शिंदखेडा शहरातील कॉग्रेसचे गटनेते तथा सतत 2 वेळा त्यांच्या खंबीर नेतृत्वात शिंदखेडा शहरावर अधिराज्य गाजविणारे अनिल वानखेडे यांच्यासोबत शिवसेनेचे उप तालुका आणि प्रमुख युवराज माळी, यांच्यासह 10 नगरसेवकांनी आज मुंबई येथे राज्याचे अर्थ व वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार आणि रोहयो व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी भाजपाचे जिल्हा परीषद सदस्य कामराज निकम, पं.स.चे माजी सदस्य सुभाष माळी, शिंदखेडा शहराध्यक्ष दिनेश सुर्यवंशी, नगरसेवक किरण चौधरी, दादा मराठे, राजेंद्र राजपूत, आदी मान्यवर उपस्थित होते. अनिल वानखेडे यांचा शिंदखेडा शहरात चांगले काम असल्यामुळे जनतेने दोनवेळा सत्ता दिली होती, याशिवाय शिंदखेडा नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर एकुण 17 जागांपैकी 8 जागा त्यांनी त्यांच्या नेतृत्वात निवडून आणल्या होत्या. त्यांच्या भाजपात प्रवेशामुळे शिंदखेडा शहरात मोठा राजकिय भूकंप झाला असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचे राजकिय समीकरण बदलणारा ठरणार आहे.
दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत केला भाजपात प्रवेश
शिंदखेडा नगरपंचायतचे गटनेते अनिल वानखेडे यांच्यासोबत माजी नगराध्यक्षा सुनंदा माळी यांचे सासरे नथा माळी, माजी उपनगराध्यक्ष अशोक देसले, बांधकाम सभापती धर्मराज पाटील, पाणीपुरवठा सभापती तुकाराम माळी, नियोजन सभापती चंद्रसिंग राजपूत, नगरसेवक मन्सुर शेख, भूषण कौठळकर, नगरसेवक राकेश महिरे, माजी सरपंच डिगंबर पाटोळे, माजी उपसरपंच भिला पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल कचवे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अरूण देसले, जितेंद्र जाधव, ग.स.बँकेचे माजी संचालक आर.एच.भामरे, अॅड. विनोद पाटील, प्रविण पाटील, माजी नगरसेवक सुनिल वाडीले, राजेंद्र माळी, दत्तू माळी, संजय माळी, सुकलाल माळी, साईनाथ मिस्तरी, गजेंद्र भामरे, श्यामकांत भामरे, महेंद्र तमखाने, अमोल मोरे, गोटूभाऊ वानखेडे, नंदू वानखेडे, नितीन सोनार, हरदपाल राऊळ, रविंद्र जीरे, भरत बडगुजर, शंकरराव शिरसाठ, प्रविण माळी, प्रशांत माळी, ईश्वर परदेशी, चंद्रकांत भिल, सुनिल भिल, अनिल बैसाणे आणि रोहिदास वाधवा आदी मान्यवरांनी दोन्ही मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रवेश केला.
भाजपा पक्ष कार्यकर्त्यांचा -ना. मुनगंटीवार
भाजपा हा पक्ष कोणत्या परीवाराचा नसुन कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, याठिकाणी कार्यकर्ता हाच आमचा परीवार आहे, याठिकाणी कार्यकर्ता मोठा असतो, शिंदखेडा शहरासाठी राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी कधीही निधी कमी पडू देणार नाही, जयकुमार रावल आणि मी एकाच मंत्रीमंडळात असलो म्हणून नव्हे तर माझा एक जवळचा मित्र म्हणून मी त्यांना मानतो, असे ना.सुधीर मुनगंटीवार यांनी नमुद करत अनिल वानखेडेसह सर्व मान्यवरांचे त्यांनी स्वागत केले. तर ना.जयकुमार रावल म्हणाले की, शहरातील पाणीपुरवठा योजना मंजूर करुन कामादेखील सुरवात झालेली आहे, याशिवाय प्रशासकिय इमारत, पोलिस स्टेशनची इमारत, वसतीगृह अशी अनेक कामे करीत असतांना बुराई नदीवर 5 काटी रूपयाचा पुल देखील मंजूर केला आहे.