शिंदखेड्यात ग्राहकांच्या जागृतीऐवजी गोंधळात पार पडला ग्राहक दिन

0

शिंदखेडा । तहसील कार्यालयात आयोजित ग्राहकदिनी जीसएटीवरून मतभेद, यासह ग्राहकांच्या लुटीकडे हेतुपुरस्सर होत असलेले दुर्लक्ष या बाबी उपस्थित करून नगरसेवक विजयसिंह राजपूत यांनी उपस्थित अधिकार्‍यांना खडे बोल सुनावले. काही काळ गोंधळाचे वातवरण निर्माण झाले होते. अखेर राजपूत यांनी कार्यक्रमातून निघून जात नाराजी व्यक्त केली. या गोंधळातच रविवारी ग्राहक दिन पार पडला.

केवळ भाषणे नको नवनिर्वाचित नगरसेवक विजयसिंह राजपूत यांनी वक्ते सी.डी. डागा यांचे भाषण थांबवत काही प्रश्‍न ऊपस्थित केले. शहरासह परीसरातून बिनधास्त पणे वृक्षांची कत्तल सूरू आहे. अवैधरीत्या वाळू वाहतूक अधिकार्यांच्या डोळ्यादेखत सूरू आहे गावातील एक रेशन दूकानधारक मालक नाशिकला राहतो त्याचे दूकान दूसराच कूणीतरी चालवतो, घेतलेल्या वस्तूंचे बिलं दिली जात नाही, जी एस टी च्या नावाखाली व्यवसायिक ग्राहकांची प्रचंड लूट करीत आहे, पोलीसांसह शासकिय अधिकार्यांचा कूणालाच धाक नाही केवळ ग्राहकांच्या नावाने भाषंणं करायचे आणि ग्राहकांच्या लूटीकडे हेतूपूरस्कर दूर्लक्ष करायचे हे प्रथम थांबवा आणि मगच ग्राहक दिन साजरा करा असा टोला राजपूत यांनी आयोजक तहसील विभागाला व ग्राहक पंचायती ला लगावला.

ग्राहकांनी जीएसटी देऊ नये
एखाद्या चौकात ग्राहक दिन साजरा करून त्यात आधी ग्राहकांच्या समस्या जाणून घेवून त्यांचे निराकरण या दिवशी करणयाचा प्रयत्न करून हा दिवस साजरा कराव, असे आवाहन मयूर पवार यांनी केले. तर प्रकाश चौधरी यांनी शासकिय अधिकार्‍यांचा याच्याशी संबंध नाही अशी भूमिका मांडली, यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ झाला. चौधरी यांच्या विधानाला आक्षेप घेत राजपूत कार्यक्रमातून निघून गेले. नंतर चौधरी यांनी कोणत्याही वस्तूवर लागणारा जी एस टी ग्राहकांनी भरण्याची गरज नसते. आधीच जी एस टी भरून व्यवसायीकाने ती वस्तू घेतलेली असते त्यामूळे ग्राहकांनी कोणत्याही दूकानदाराला जी एस टी ची अधिक रक्कम देवू नये असे आवाहन केले.

तहसीलदारांची नाराजी
तहसीलदार सूदाम महाजन यांनी राजपूत यांनी सभा सोडून जाण्याबाबत नाराजी व्यक्त केली. कार्यक्रम म्हणजे गारूड्याचा खेळ नाही कार्यक्रमाला शिस्त असते. ती प्रत्येकाने पाळली पाहीजे. कूणी दूकानदार पावती देत नसेल तर किंवा फसवत असेल तर त्याचेविरूध्द तक्रार करण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. त्यासाठी ग्राहक मंच आहे. ग्राहकांची जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. तसेच जीएसटी बाबत बोलतांना ते म्हणाले की वस्तू एकच मात्र वेगवेगळ्या ठिकाणी एकच कर अनेक ठिकाणाहून वसूल केला जातो मात्र यावर कोणीच आवाज उठवत नाही छोट्या छोट्या व्यावसायिक व भाजीपाला विक्रेत्या वर तक्रार केली जाते त्या बाबत ग्राहक मंचाने आवाज उठवणे गरजेचे असल्याचे, मत तहसीलदार रांनी व्रक्त केले.

गावा गावात माहिती द्यावी:
प्रा. प्रदिप दिक्षीत यांनी चौधरी चूकीची माहीती देत असल्याचा आरोप करीत जीएसटी भरावाच लागतो असे सांगितले. पाटण येथील 80 वर्षाचे ए. ओ. पाटील यांनी प्रत्रेक गावात ग्राहक संरक्षण कायद्याची माहीती देणारे कार्यक्रम घ्रावे, असे सुचविले.