शिंदखेड्यात डॉ.बाबासाहेबांचा पुतळा व्हावा यासाठी निवेदन

0

शिंदखेडा। केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले नंदूरबार जिल्हा दौ-यावर असताना शिंदखेडा शहरात तहसिल कार्याल्याजवळील नियोजीत जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी मागणी येथील आरपीआय कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

शहराच्या सौंदर्यात पडेल भर
शिंदखेड्यातील आर.पी.आय कार्यकर्ते संजय पाटोळे यांनी शिंदखेडा येथेही भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा असावा असे निवेदन देऊन शहराच्या सौंदर्यात भर टाकावी असा आग्रह धरला आहे.संजय पाटोळे , कैलास आखाडे,ईश्वर आखाडे, युवराज पाटोळे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.शिंदखेड्यात ना.जयकुमार रावळ यांच्या प्रयत्नातून अद्ययावत प्रशासकिय इमारत बांधण्यात आली असून त्या इमारती समोर सध्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा आहे. त्याचे रूपांतर पूर्णाकृती पुतळ्यात केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे असे नमूद केले आहे. दिलेल्या निवेदनास ना. आठवले यांनी हि दुजोरा दिला असून लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.