शिंदखेडा। दहावीच्या परीक्षेत येथील मिराबाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थीनी निकीता जगदिश पाटिल ही शहरातील तीनही केंद्रात 100 टक्के मार्कस् मिळवून प्रथम आली आहे. गर्ल्स हायस्कूल मध्ये 141 पैकी 131 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. यात 63 विद्यार्थीनी विशेष प्राविण्य,प्रथम श्रेणीत 49,व्दितीय श्रेणीत 18, तृतीय श्रेणीत एका विद्यार्थीनिने यश संपादन केले. निकिताला थेअरी विषयांत 479 आणि 21 मार्कस् खेळातील विशेष प्राविण्याचे असे एकूण 500 मार्कस् मिळवून शहरातील तीनही केद्रात प्रथम आली आहे. व्दितीय वैष्णवी अशोक पाटिल(95 टक्के), माधुरी राजेंद्र ठाकरे(94.20 टक्के) मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
शाळेत आणि खाजगी क्लासेस मध्ये शिकविलेल्या भागावर घरी येवून रिव्हिजन केली.अभ्यासात सातत्य ठेवले. अभ्यासासाठी मन देखील स्वस्थ असले पाहिजे त्यासाठी खेळाकडे देखील लक्ष दिले. व्हॉलीबॉल व तलवार बाजी या खेळात अधिक आवड होती. तलवार बाजीत निकिताने रजत पदक मिळविले आहे. यासाठी क्रिडा शिक्षक कैलास चौधरी यांचे मार्गदर्शन मिळाले. अभ्यास आणि खेळ यांच्यांत सांगड घातल्यानेच हे यश मिळाल्याचे निकिताने दै.जनशक्तिशी बोलतांना सांगितले.
जनता हायस्कूल:- शहरातील जनता हायस्कूल मध्ये 218विद्यार्थ्यांपैकी 209 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 95.87टक्के निकाल लागला आहे.यांत 124विद्यार्थी विशेष प्राविण्य, 64विद्यार्थी प्रथम श्रेणी, व्दितीय श्रेणीत 19,तर दोन विद्यार्थी पास श्रेणी घेवून यश मिळवले.या शाळेत प्रथम प्राजक्ता बडगूजर(95.20),व्दितीय दिनदयाल बडगुजर(92.40),तृतीय सृष्टी माळी(92.00),सोनाली मालचे(92.00).
स्वामी समर्थ हायस्कूल:- या शाळेचा दहावीचा निकाल 88.63टक्के लागला असून रतिका ठाकूर (87), हिने प्रथम क्रमांक मिळविला,व्दितीय आकाश संदाशिव(81.80),तृतीय दिपक पवार(78.80).
एन.डी.मराठे विद्यालय:- या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असेन सर्वच्या सर्व 52 विद्यार्थी उत्तीर्ण्।झाले आहेत. यांत प्रथम-पायल सूनिल जगदाळे(92.00),व्दितीय-पूजा भगवान सूर्यवंशी(89.40),पाटिल दिव्येश विलास(89.40),तृतीय-चैताली नारायण बेहेरे(89.20) उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन ,उपाध्यक्ष, सचिव ,पदाधिकारी,मूख्याध्यापक,.शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
पिंपळनेर येथील धनश्री घरटे 94.40 टक्के मिळवून प्रथम
कै.एन.एस.पी.पाटिल विद्यालय
सामोडे येथील रहिवासी व पिंपळनेर येथील कै.एन.एस.पी.पाटिल विद्यालय पिंपळनेरची विद्याथिनी कु.धनश्री प्रकाश घरटे या विद्यार्थिनीने एसएससी परीक्षेत 94.40% गुण मिळून घवघवीत यश संपादन केले. तसेच कु.पल्लवी भिलाजी जिरे हिला शालांत परिक्षेत 92.20 टक्के गुण मिळाले असून तिला मुख्याध्यापक, वर्गशिक्षक व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. पल्लवी ही वार्सा येथील पत्रकार भिलाजी जिरे व देशशिरवाडे येथील जि.प.शाळेच्या शिक्षिका संगिता जिरे ( रायते ) यांची ती मुलगी आहे.
कन्या विद्यालय, सामोडे
येथील कन्या विद्यालयाचा निकाल 95.23 टक्के लागला असून जान्हवी विक्रांत भदाणे 90 टक्के गुण मिळूवन प्रथम, गायत्री संजय शिंदे 85 टक्के द्वितीय, तर तन्वी दिनेश भदाणे 84 टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दयाराम शिंदे, सचिव विनायक देवरे, तसेच सर्व संचालक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनिषा शिंदे, सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय
इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल एकूण 85.54 टक्के लागला. त्यात सेमी इंग्रजी माध्यमाचा 97.29 तर मराठी माध्यमाचा 76.08 टक्के इतका लागला. त्यात पुरकर आदर्श शरद 85.20, देसाई मुयरी विक्रम 82.80 तर पडवाळ अर्जुन विजय 80.60 या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेेंद्र मराठे, संचालक जयेश मराठे, प्राचार्य श्रीमती पवार एस.एस. आदींनी अभिनंदन केले आहे.