शिंदखेडा ।आंतरराष्ट्रीय योगदिन येथील एम.एच.एस.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी योग शिक्षक आर.पी.चौधरी यांनी शास्त्रीय पध्दतीने योगाची माहिती प्रात्यक्षिकासह दिली. हायस्कूल व महाविद्यायातील प्राचार्य , विद्यार्थी,विद्यार्थीनी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगासन प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला. यावेळी चौधरी यांनी विद्यार्थीदशेत योगाचे महत्व विषद केले.