भुसावळ- किरकोळ कारणावरून तालुक्यातील शिंदे येथे डॉक्टरावर हल्ला करून त्यांना जबर मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी अटकेतील तिघाही आरोपींची मंगळवारी भुसावळ न्यायालयाने जामिनावर सुटका केली. शिंदी येथील तक्रारदार डॉ.सचिन पितांबर महाजन (35) यांच्या वडिलांनी संशयीत आरोपींना घरातील कचरा आपल्या बाजूला टाकू नये, असे सांगितल्यानंतर आरोपी दीपक महासिंग निकम, संतोष महासिंग निकम व महासिंग काशीनाथ निकम यांनी डॉ.सचिन यांना लोखंडी पट्टीने मारहाण केली होती तसेच कुटुंबियांनाही अपमानास्पद वागणूक दिली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघाही पिता-पूत्रांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी आरोपींना भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका झाल्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सांगितले.