शिरपूर। शिरपूर शहरातील श्री क्षत्रिय अहिर शिंपी शिक्षण प्रसारक मंडळाला अखिल भारतीय श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेच्या वतीने नुकताच प्रथम क्रमांकाचा दिशा दर्शक पुरस्कार देवून सन्मान केला. शिरपूरात श्री क्षत्रिय अहिर शिंपी शिक्षण प्रसारक मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम हाती घेतले आहे. या कामी समाज बांधवांकडून देखील चांगल्याप्रकारचे सहकार्य लाभत असल्यामुळे मंडळाच्यावतीने बेटी बचाव अभियान, वधु-वर परिचय मेळावा, महिला सबलीकरण, विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास, बेरोजगारांसाठी मार्गदर्शन शिबीर, ग्राम स्वच्छता अभियान, ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार, विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा, रक्तदान शिबीर, रक्तगट तपासणी शिबीर, जिल्हा युवक मेळावा यांसह दरवर्षी सभासद नोंदणी यांसह इतर उपक्रम राबविले जातात. या पुरस्काराचे वितरण नाशिक येथील इच्छामणी लॉन्समध्ये अखिल भारतीय शिंपी समाजाचे अध्यक्ष विजय बिरारी यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी विश्वस्त शांताराम सावळे, डी.व्ही.बिरारी, एन.एन.बागुल, गोपाळराव शिंपी आदी पदाधिकार्यांची उपस्थिती होती. सदर पुरस्कार हा शिरपूरातील श्री क्षत्रिय अहिर शिंपी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नितीन बाविस्कर, पंढरीनाथ यादवराव सोनवणे, गुलाबराव निकुम, अनिलराव जाधव, महेश बाविस्कर, अशोक देवरे, योगीराज बोरसे, गोपाळ खैरनार यांच्यासह मंडळातील सदस्यांनी स्विकारला. मंडळाचे अध्यक्ष नितीन बाविस्कर यांनी मध्यवर्ती संस्थेने कामाची दखल घेतल्याने त्यांचे आभार मानले. तसेच या पुरस्काराचे श्रेय समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते पंढरीनाथ यादव सोनवणे, बाबुराव यादव बाविस्कर, बाबुलाल दगडू भामरे, भगवान शंकर पवार, लोटन पवार, गुलाबराव निकुम (जी.एल.टेलर), अनिल यादवराव जाधव (गेलॉर्ड टेलर), यशवंत बाविस्कर , चंद्रशेखर बिरारी, दिलीप सावळे यांच्यासह समाजातील महिला मंडळ युवक, युवतीमंडळ व समाज बांधवांना दिले.
श्री संत नामदेव महाराज यांना अभिवादन
समाजाचे आराध्य दैवत असलेले श्री संत नामदेव महाराज यांची 667 वी पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली. शहरातील अंबिकानगर भागात असलेल्या शिंपी समाज कार्यालयाजवळून श्री संत नामदेव महाराजांची मिरवणूक व पालखी काढण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नितीन बाविस्कर यांनी प्रास्ताविकात समाजाच्या इतिहासाला उजाळा देत सांगितले की, सदर पुण्यतिथीचा उपक्रम हा सन 1948 पासून सुरू झाला असून सन 1952 ला समाज कार्यकारणीचे गठन करण्यात आले. त्यानंतर 1960 ला मंडळाला अधिकृत शासनमान्यता घेण्यात आली. यावेळी अखिल भारतीय मध्यवर्ती संस्थेचे विश्वस्त शांताराम सावळे माजी अध्यक्ष तथा विश्वस्त डी.व्ही.बिरारी , विश्वस्त एन.एन.बागुल, मध्यवर्ती कार्यकारणी सदस्य शरद शिंपी , सुनिल जगताप, महेंद्र बाविस्कर आदिंची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीस दीपप्रज्वलन करून गणेश पुजन व प्रतिमा पुजन करण्यात आले.
शिंपी समाजाच्या कामांचा घेतला आढावा
मंडळाकडून राबविण्यात येणार्या या सर्व उपक्रमांबाबत समाजातील अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेने दखल घेतली त्यानुसार राज्यभरातील शिंपी समाजाने केलेल्या सर्व कामांचा आढावा घेवून येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी शिक्षण प्रसारक मंडळाने गेल्या पाच वर्षांपासून केलेल्या कामाबद्दल मंडळाला 3240 गुण देवून महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचा दिशा दर्शक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या पुरस्काराचे वितरण नाशिक येथील इच्छामणी लॉन्समध्ये अखिल भारतीय शिंपी समाजाचे अध्यक्ष विजय बिरारी यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी विश्वस्त शांताराम सावळे, डी.व्ही.बिरारी, एन.एन.बागुल, गोपाळराव शिंपी आदी पदाधिकार्यांची उपस्थिती होती. मंडळाचे अध्यक्ष नितीन बाविस्कर यांनी मध्यवर्ती संस्थेने कामाची दखल घेतल्याने त्यांचे आभार मानले. तसेच या पुरस्काराचे श्रेय समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते पंढरीनाथ सोनवणे, बाबुराव बाविस्कर, बाबुलाल भामरे, भगवान पवार, लोटन पवार, गुलाबराव निकुम, अनिल यादवराव जाधव, यशवंत बाविस्कर, चंद्रशेखर बिरारी, दिलीप सावळे यांच्यासह समाजातील महिला मंडळ युवक, युवतीमंडळ व समाज बांधवांना दिले.
विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
शिरपूर । शहरातील समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच शहरातील अंबिका नगर भागातील शिंपी मंगल कार्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राध्यापक कांतीलाल बाविस्कर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त राजेंद्र बागुल, रमेश बाविस्कर, राजेंद्र खैरनार, रविंद्र खैरनार, देविदास खैरनार आदी मान्यवरांच्या हस्ते गुणवंताचा सत्कार करण्यात आला. येणार्या काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीर समाजाच्या वतीने आयोजीत करावे अशी विनंती तीने केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.कांतीलाल बाविस्कर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले तर मंडळाचे अध्यक्ष नितीन बाविस्कर यांनी समाज कार्याचा जडण-घडणीत समाज हा योग्यप्रकारे पाठीशी राहत असल्याबद्दल आभार मानून येणार्या काळात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबीर आयोजीत करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला असंख्य समाज बांधवांची,महिलांची उपस्थिती होती.