शिंपी समाजातील ज्ञानज्योती, जीवनज्योती पुरस्कार वितरीत

0

जळगाव। शिं पी समाजातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांंना ज्ञानज्योती, सामाजिक कार्याबद्दल जीवनज्योती पुरस्कारासोबत संत शिरोमणी नामदेव अभंगगाथा, गौरवपत्र देण्यात आले. यावेळी पत्रकार मिलींद कुलकर्णी अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे हभप हेमंत जोशी, हभप रामचंद्र चिंचोलकर महाराज पैठण, गुरुवर्य दादाश्री झोपे, पांडुरुंग शिंपी, दोंडाईचा, सपत्नीक, मिनाताई सिरसाठे उपस्थित होते. मालविका नेवे हिने भक्तीगीत गायले.

यांनी केला सन्मान
मान्यवरांचा सत्कार राकेश सिरसाठे, सुनिल भावसार, छोटू नेवे, अविनाश सिरसाठे, योगिराज मराठे व गणानाम परिवाराने केला. संतशिरोमणी नामदेव महाराज, सरस्वती देवी प्रतिमेस तसेच ज्ञानज्योती पुरस्कार कै. शांताराम एस.सिरसाठे, स्व. रमाबाई एस.सिरसाठे, व जीवनज्योतील पुरस्कार कै. सुकलाल देवचंद सिरसाठे प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

यांना मिळाले पुरस्कार
डॉ.शुभम जगताप, नम्रता जगताप, ऋषिकेश जगताप, भाग्यश्री खैरनार, कोमल जगताप, रुचा शिंपी, राजश्री शिंपी, हर्षवर्धन जगताप, युक्ता कापडे यांना सन्मानीत करण्यात आले. राष्ट्रीय उपाध्यक्ष शरद बिरारी, रमेश बोरसे, किशोर सोनवणे, जगतापसर, बापू खैरनार, सुधाकर शिंपी उपस्थित होते. बाभुळकर, सतीश पाटील, सुनिल दुसाने, राजू बिरारी, गणानाम परिवार, अंकुश सिरसाठे, रश्मी सिरसाठे, संधानशीवेताई, आमिशा सिरसाठे यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन गौरव सिरसाठे, साक्षी सिरसाठे, आभार रविंद्र संधानशिवेंनी मानले.

पांडुरंग शिंपी यांचा सन्मान
बोधचिन्हाची माहिती साक्षी सिरसाठे, पुरस्कारार्थींंची माहिती आकांक्षा सिरसाठे यांनी दिली. हभप चिंचोलकर महाराज यांनी नामप्रबोधन केले. मान्यवरांचेहस्ते दोंडाईचा येथील पांडुरंग नामदेव शिंपी यांचा सपत्नीक प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळा आयोजन कार्यक्रमांचे 22 वर्षे पुर्ण होवून झाले या कार्याबद्दल गौरवोद्गार मान्यवरांनी श्री-प्रसाद मासिकांचे संपादक हभप हेमंत जोशी यांनी काढले.