शिंपी समाज आर्थिक संकटात

0

एरंडोल: येथे क्षत्रिय अहिर शिंपी समाज बांधवांतर्फे तहसील कार्यालयात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार राजेंद्र आहिरे यांनी निवेदन स्वीकारले. लोक डाऊन मुळे शिंपी समाज बांधवांचे हाल होत आहेत चरितार्थ चालवणे जिकरीचे झाले आहे हातावर पोट असलेला शिंपी समाज मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे असे निवेदनात नमूद केले आहे.

यांची होती उपस्थिती

निवेदन देताना अहिर शिंपी समाज अध्यक्ष दीपक जगताप सचिव तुषार शिंपी निलेश जगताप संजय इसाई मनोज शिंपी सोनू शिंपी इत्यादी मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते.