शिंपी समाज विद्यार्थ्यांना ज्ञानज्योतीसाठी आवाहन

0

जळगाव । कै. शांताराम सुकलाल सिरसाठे स्मृतीनिमित्त शिंपी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल ज्ञानज्योती पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांमार्फत 1996 पासून हा पुरस्कार दिला जातो. दहावी, बारावी, पदवीधर आणि पदवीकाधारक विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती स्मृती चिन्ह प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देवून गौरविण्यात येते. जिल्ह्यातील शिंपी समाजातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती पुरस्कार आयोजन करण्यात आले आहे. स्व. रमाबाई सुकलाल सिरसाठे यांचे स्मृतीनिमित्त जिल्ह्यातील पदवीधर किंवा पदवीकाधारक पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यास एकीकडील प्रवास भाडे आयोजकातर्फे प्रत्येक वर्षी देण्यात येते. विद्यार्थी व विद्यार्थीनी आपले पासपोर्ट फोटोसहीत मार्कसीट व लिव्हींग सर्टीफीकेटच्या झेरॉक्स अ‍ॅटेस्टेडकॉपी आयोजक ज्ञानज्योती पुरस्कार भाग्यलक्ष्मी, 42 जयनगर हॉटेल रॉयल पॅलेस शेजारी जळगाव येथे 12 ऑगस्टपर्यंत पाठवावे, असे आवाहन आयोजकांतर्फे राकेश शिरसाठे यांनी केले आहे.