चाळीसगाव । विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकलच्या गुणांची भिती दाखवून शिकवणीला येण्यास भाग पाडून त्यांची आर्थिक लूट करणार्या लुटारू शिकवणी माफीया यांना कायमस्वरूपी नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे. तसेच ज्या शिक्षण संस्थांचे शिक्षक नोकरी असतांना बेकायदेशीर शिकवण्या घेत आहेत, त्या संस्थांचे अनुदान बंद करा. शिकवणी माफीया तसेच संस्थांवर सरसकट कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मार्कांची भिती दाखवत येण्यास भाग पाडतात
संभाजी सेनेने गटशिक्षणाधिकारी यांना शहर व तालुक्यातील वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालयातील गळेलठ्ठ पगार घेणार्या व विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजात जाणीवपुर्वक न शिकवणार्या व शिकवणीस येण्याकरीता भाग पाडून त्यांची आर्थिक लुट करून पिळवणूक करणार्या शिक्षकांची यादी वेळोवेळी दिली असतांना शहरातील आं बं. हायस्कुल, राष्ट्रीय विद्यालय, अभिनव शाळा, गुरूकुल शाळा, रा.वि.कन्या शाळा, आं.बं. मुलींची शाळा मधील अनेक शिक्षक राजरोसपणे गट शिक्षण अधिकारी यांचेशी अर्थपुर्ण संंबंध असल्याचे म्हटले आहे.
शिकवणी घेतांना सापडले
आपल्या घरातील इतर सदस्यांच्या नावाने क्लासेस चालविणार्यांवर क्लासेस सुरू असतांना त्यांचेकडे असलेली विद्यार्थी संख्या तसेच विद्यार्थी कोणत्या शाळेतील कोणत्या वर्गातील आहेत याबाबत पंचनामा करावा आणि ते क्लासेस च्या नियमानुसार क्लासेस चालवित आहेत का? सर्व विद्यार्थ्यांना सुविधा पुरवित आहेत का? याचा पंचनामा करावा मागील काळात आ.ब.हायस्कुल,अभिनव शाळेचे काही शिक्षक रंगेहात शिकवण्या घेतांना सापडले होते, परंतू ठराविक लोकांना गटशिक्षणाधिकार्यांनी सोडून दिले. म्हणून शिक्षण माफिया आमचे कुणीहि वाकडे करू शकत नाही असे सांगत असल्याने त्यांचा अर्थपुर्ण संबंध असल्याचे सिध्द होते.
अन्यथा..बोंबाबोंब आंदोलन
कारवाई न झाल्यास संभाजी सेनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्या कार्यालयाच्या आवारात किंवा कक्षात बोंबाबोंब मारून आंदोलन करण्याचा इशारा संभाजी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.