शिकावू वाहन परवाना मोशीत कार्यालयातून

0

पिंपरी-चिंचवड: मोशी येथील नवीन आरटीओ इमारतीचे तीन वर्षापुर्वी बांधकाम होऊनही त्यामध्ये अद्याप कोणतेही प्रशासकीय कामकाज सुरु झाले नव्हते. पण गेल्या काही दिवसांपासून या इमारतीमध्ये चिखली येथील शिकाऊ वाहन चालक परवाना (लर्निंग लायसन) विभाग सुरु केला आहे. यामुळे खर्‍या अर्थाने आरटीओने नवीन इमारतीमधील कामाचा शुभारंभ केला आहे.

जुनी इमारत होती अपुरी
त्यामुळे नागरिकांना आता शिकाऊ परवाने घेण्यासाठी आरटीओच्या नवीन इमारतीमध्ये जावे लागणार आहे. चिखली येथील इमारतीमध्ये येणार्या नागरिकांना अनेक गैरसोईंना सामोरे जावे लागत होते. जुन्या इमारतीच्या पार्किंग तळावरून शिकाऊ परवाना विभागाचे कामकाज सुरू होते. याठिकाणी जागा कमी असल्याने नागरिकांची मोठी गर्दी होत असे. मोटार वाहन निरीक्षकांना देखील पार्किंग तळामध्ये बसून तपासणी करावी लागत होती. आरटीओच्या नवीन इमारतीमध्ये शिकाऊ परवाना विभाग सुरू केला असून, ऑनलाईन परीक्षेसाठी 35 संगणक बसवण्यात आले आहेत.

तीन वर्षांनी कामकाज
काम पुर्ण होऊन तीन वर्षापूर्वी इमारातीचे उद्घाटन झाले होते. उर्वरीत कामे करण्यास आणि लालफितीच्या कारभारामुळे तब्बल तीन वर्षानंतर पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाचा एक विभाग स्थलांतरीत झाल्याने या इमारतीमध्ये आता ख-या अर्थाने कामाला सुरुवात झाली आहे. यानंतर इतर विभागही टप्प्या-टप्प्याने स्थलांतरीत करण्यात येणार आहेत.