शिक्रापूर । शिक्रापुर विठ्ठल मंदिरात गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या काकड पहाट आरतीची शनिवारी (दि.4) उत्साहात सांगता झाली. शिक्रापूर येथील काकड पहाट आरतीला जवळजवळ 70 वर्षांची परंपरा आहे. कै. सासवडे गुरुजींनी सुरू केलेली ही परंपरा शिक्रापूरमधील ग्रामस्थ व भजनी मंडळ यांनी आजतगायत सुरू ठेवलेली आहे.
कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या या काकड आरतीमुळे ग्रामस्थांना भल्या पहाटेच अभंग ऐकण्याची संधी मिळत होती. अरुणदादा करंजे, प्रताप बांदल, विजय मांढरे यांनी गेल्या एक महिन्यापासून काकड आरतीचे योग्य नियोजन केले होते. काकड आरती सांगतेवेळी महिलांची संख्याही भरपूर होती. थिटे, मांढरे, गफले तसेच मंगल शिर्के, विजय तकटे, शंकर महाजन, महेश शिर्के या सर्वांनी गेले महिनाभर रोज पहाटे आरतीसाठी उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केला.