शिक्रापुरात व्याख्यानमाला

0

सणसवाडी । गणेश उत्सव व बलराम जयंतीनिमित्त अखिल भारतीय किसान संघ व श्री बलराम पतसंस्था यांच्या वतीने दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. ही व्याख्यानमाला शिक्रापूर येथे गजानन मंगल कार्यालयात रविवारी (दि.27) व सोमवारी (दि.28) दुपारी 3 ते 5 या वेळेत होणार आहे.

रविवारी ज्येष्ठ विचारवंत व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे हे देशातील इतिहासाविषयी संभ्रमावस्था व वस्तुस्थिती तसेच पाणी या विषयावर भानुदास महाराज तुपे मार्गदर्शन करणार आहेत. सोमवारी प्रसिद्ध कवी व विचारवंत आम्ही दैवाचे शेतकरी रे या वर संबोधन करणार आहेत. या व्याख्यानमालेला युवा वर्ग तसेच इतिहास प्रेमी वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अयोजकांनी केले आहे.