शिक्रापूर बसस्थानकाची दुरावस्था

0

शिक्रापूर (मंदार तकटे) । पुणे नगर महामार्गावर वसलेले शिक्रापूर हे मध्यवर्ती गाव आहे. या गावात असलेले बसस्थानक सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या तसेच स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेमुळे शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. शिक्रापूर पुणे नगर महामार्ग तसेच नियोजित मुंबई सोलापूर या महामार्गावरील मध्यवर्ती गाव असल्याने या गावातून मोठ्या प्रमाणातून वाहनांची ,तसेच प्रवाशांची वर्दळ चालू असते. त्यामुळेच पूर्वीच्या काळात या सर्व गोष्टींचा विचार करूनच शिक्रापूर येथे मध्यवर्ती बसस्थानक साधारणतः चाळीस वर्षांपूर्वी बांधले गेले. गेल्या सात आठ वर्षांपूर्वी ह्या बसस्थानकाच्या वापर एसटी बस थांबण्यासाठी होत होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून ह्या बसस्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या सुविधांअभावी थांबत नसल्याचे दिसून येत नाही म्हणजेच या बसस्थानकात एसटी बस थांबत नसल्याने या बसस्थानकाकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहेत.

राज्य परिवहन महामंडळ आर्थिक तोट्यात जात असताना मुख्य बस स्थानके मोडकळीस अली आहेत. यामध्ये शिक्रापूर बसस्थानकाचाही समावेश असून या स्थानकाचा परिसराचा उपयोग कचरा टाकण्यासाठी होत असल्याने हे स्थानक म्हणजे कचरा डेपो झाला आहे. राज्यभरात एसटी तोट्यात चाललेली असताना परिवहन मंडळाकडून लाखो रुपयांच्या स्थावर मालमत्तेकडे दुर्लक्ष होत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणून शिक्रापूर बसस्थानकाच्या उल्लेख करावा लागेल. पुण्यावरून विदर्भाकडे जाणार्‍या सर्व एसटी बसेस या बसस्थानकामधे थांबवायस हव्यात त्यामुळे निश्‍चितच चाकण चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे कारण या सर्व एसटी बस प्रवाशी घेण्यास व उतरवण्यास चाकण चौकातच उभ्या राहतात त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडते. तसेच बसस्थानकाचा वापर चालू झाल्यास हे बसस्थानक सुस्थितीत येऊन शिक्रापूर बसस्थानक हे परिसरात निश्‍चितच एक आदर्श बसस्थानक होण्यास वेळ लागणार नाही.

स्थानकाला वाहनतळाचे स्वरुप
बसस्थानकाच्या ढासळलेल्या भिंती, फुटलेलेपत्रे, निवासी इमारतींचे झालेली पडझड यामुळे चाळीस वर्षांपूर्वी बसस्थानकाची केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याचे पाहावयास मिळत आहे. बसस्थानकात खाजगी वाहनांची पार्किंग या बसस्थानकात एसटी बसेस येत नसल्याने ,तसेच एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांचा दुर्लक्षामुळे या बस्थानकाचा वापर दुचाकी व खाजगी बसचालक वाहनतळ म्हणून करत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

विदर्भ मराठवाड्याकडे जाणार्‍या बस थांबत नाहीत
शिक्रापूर येथे मोठ्या प्रमाणावर बाहेर गावातून रोजगारासाठी, व्यवसायानिमित्त आलेले लोक राहतात. सुट्टीच्या काळात गावी जायचे असेल तर एसटी बससाठी चाकण चौकात उन पावसात उभे राहावे लागते कारण अहमदनगर, औरंगाबाद, बीड , जालना, तसेच विदर्भाकडे जाणार्‍या कोणत्याही एसटी बस या स्थानकाकडे फिरकत नाहीत. त्यामुळेच बसस्थानकाचा उपयोग सध्यातरी कचरा टाकण्यासाठी केला जात आहे.