कवठे येमाई – शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील एन टेक्स ट्रान्सपोर्टेशन कंपनीच्या कार्यालयातून लॉकरसह काही इलेक्ट्रिक साहित्याची चोरी झाली असल्याची घटना घडली आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. शिक्रापूर येथील एन टेक्स ट्रान्सपोर्टेशन लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापक जगदीश चिमोटे हे रात्रीच्या सुमारास कंपनीचे ऑफिस बंद करून घरी गेले होते. सकाळच्या सुमारास कंपनीचे कार्यालय उघडणारे कर्मचारी प्रशांत सोनवणे हे आले असताना त्यांना शटर उचकटलेले दिसून आले. सोनवणे यांनी लगेचच कंपनीचे व्यवस्थापक जगदीश चिमोटे यांना याबाबत माहिती दिली. चिमोटे यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करीत शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.