जळगाव : मू.जे.महाविद्यालयात जनसंज्ञापन व वृत्तविद्या विभागातर्फे शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारत विविध विषयांवर विद्यार्थी व शिक्षकांच्या तासिका घेतल्या.
यात सावन वळवी-संवाद व संवादाचे प्रकार, गजानन खर्डे-बातमी लेखन, संदीप माळी-जाहिरात लेखन, मनोज बिर्हारी-जनसंवाद, हमीद बारेला-प्रदूषण व प्रदूषणाचे प्रकार, सागर सोनवणे-पर्यावरणाचे महत्व, प्रियांका अहिरे-पत्रकारितीचे कर्तव्य या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर तासिका घेतल्या.
यावेळी विभाग प्रमुख प्रा.विश्वजीत चौधरी,प्रा.प्रशांत सोनवणे, केतकी सोनार तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.