नवी दिल्ली: आज मंगळवार २० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. परीक्षेच्या काळात तणावमुक्त कसे राहावे याबाबत मोदी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्येवर खुल्यापणाने चर्चा करावी, विद्यार्थी आपली समस्या खुलेपणाने सांगू शकत नाही. मात्र शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संबंधी मैत्रीपूर्ण असेल तर आपल्या मनातील गोष्ट विद्यार्थी खुलेपणाने शिक्षकांना सांगतील. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण नाते जपावे असे मार्गदर्शन मोदींनी केले. ज्या समस्या मित्र, नातेवाईक यांच्याकडे मांडता त्या समस्या आज विद्यार्थ्यांनी माझ्यासमोर खुलेपणाने समस्या मांडल्या त्याचे मला आनंद आहे असे मोदींनी सांगितले.
सलग तिसऱ्या वर्षी मोदी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे संवाद साधत आहेत. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.मोदींनी विद्यार्थ्यांना तणावमुक्तीचे धडे दिलेत. जीवनात नाराज होऊ नका, नाराजीत कधीही जीवन जगू नका असा सल्ला मोदींनी विद्यार्थ्यांना दिला. अपयश हा यशातून पुढे जाण्याचा मार्ग असतो असे मोदींनी सांगितले.
आपल्या मनातील भावना तुम्ही तुमच्या परिवाराकडे व्यक्त करा. मनात भावना साठवून ठेवू नका असे आवाहनही मोदींनी विद्यार्थ्यांना केले. अभ्यास कोणत्याही वेळी करा, वेळेच्या बंधनात अडकू नका. जेंव्हा वेळी चांगली वाटत असेल तेंव्हा अभ्यास करा. रात्रीच्या वेळी अभ्यास नाही झाला तरी चालेल दिवसा जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा अभ्यास करा. अभ्यासासाठी निमित्त शोधू नका, कारणे दाखवू नका असा सल्ला मोदींनी विद्यार्थ्यांना दिला.