पाचोरा । तालुक्यातील पेन्शनचा लाभ घेत असलेल्या शिक्षकांना पेन्शन मिळण्यात अनेक अडचणी येत आहे. निवृत्त शिक्षकांना दर महिन्यात मिळणारे निवृत्ती वेतन वेळेवर मिळत नाही, खोट्या सबबी सांगून टाळाटाळ करण्यात येत असते. वेतन का मिळत नसल्याचे विचारण्यासाठी गेलेल्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत नाही.
तसेच मनिषा शिवाजी पाटील यांच्या बदलीबाबत पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले. निवेदनावर प्रभाकर काटे, भास्कर सोनवणे, महारु अहीरे, शशी साबळे, भरत खैरनार, मोरसिंग जाधव, चावदस सुरवाडे, पिंताबर पाटील या पेंशनवर शिक्षकांच्या स्वाक्षर्या आहेत.