शिक्षकांच्या मतदार संघातील आमदार शिक्षकच हवा

0

शिरपूर । शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी टी.डी.एफची निर्मिती झाली आहे. पेन्शन,अनुदानसाठी लढा दिला,उपोषण केले. ही संघटना पुरोगामी विचारांची आहे. सध्या भांडवलशाही विरूद्ध लोकशाही असा हा लढा आहे. पण लोकशाहीचा विजय करा आमच्या रक्ताच्या कणाकणात टी.डी.एफ.आहे.शिक्षकांचा आमदार डॉक्टर,इजिनिअर नको तर शिक्षकच हवा. तरच शिक्षकांचे प्रश्‍न सुटतील.विभागातील दहा उमेदवार एकत्र आहेत हा टी.डी.एफचा विजय आहे. निशांत रंधेच्या मागे मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ताकद आहे ही कौतुकास्पद गोष्ट आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र टी.डी.एफ.चे कार्याध्यक्ष फिरोज बादशाह यांनी केले. नाशिक विभागातील शिक्षक मतदार संघातील टी.डी.एफ.च्या कार्यकर्त्यांचा मेळावा शिरपूर येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी टी. डी.एफ.चे कार्याध्यक्ष फिरोज बादशहा बोलत होते. याप्रसंगी .डी.भिरूड, आर.डी.निकम,आप्पासाहेब शिंदे, राजेंद्र लांडे पाटील,एस.बी.देशमुख,भाऊसाहेब कचरेपाटील, व्ही. आर. पानसरे, ए. एल.लाठर,एस.एस. लगड, व्यासपिठावर उपस्थित होते.

टीडीएफ कार्यकर्त्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
जेष्ठ कार्यकर्ते सुभाष कुलकर्णी,शिवाजीराव निरगुडे ,चांगदेवराव कडु,ज्ञानेश्‍वर कानडे,राजेंद्र भोसले,जोरगेकर सर,रहिस अहमद ,नईम शाईन व बाळासाहेब सुर्यवंशी , आशा रंधे, लीला रंधे,सारीका रंधे, आर.एफ.पाडवी, नगरसेवक रोहित रंधे, रहेमान वळवी, विजयराव दहिते, ग.स.संचालक संजय शिंदे, शशांक रंधे, शामकांत पाटील, नांद्रेसर,एच.जी.इंगळे, नरेंद्र अहिरे, संजय वाघमारे,नानासाहेब पाटील, सुनिल पाटील, हेमंत चौधरी, सचिन पवार ,उदय वळवी, आर.बी.शिसोदे, राजेंद्र कोतकर, डी.जी.पवार,बी.एस.पाटील, बाळासाहेब खैरनार ,संभाजी गाडे,प्रकाश नानवडे, नगर,चांगदेवराव खैरनार, रवींद्र शिंदे, आदी उपस्थित होते. यावेळी अघोषितशाळा संघटनेचे निवेदन मान्यवरांनी स्विकारले. यावेळी नगर, नाशिक,जळगाव,नंदुरबार,धुळे जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटना, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालय संघटना ,कलाध्यापक,शारीरिक शिक्षण संघटना, शिक्षक-शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी,प्रतिनिधी व टी.डी.एफ.चे कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन ए.ए पाटील यांनी तर आभार उत्तम माळी यांनी मानले.