शिक्षकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

0

फैजपूर । विना अनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षकांच्या मागण्या मान्य करुन आमचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशा मागणीचे निवेदन येथील मौलाना अबूल कलाम आझाद हॉयस्कूलच्या विद्यार्थ्यांनी फैजपुर प्रांतकार्यालयाला निवेदन दिले आहे. उच्च माध्यमिक व कनिष्ट महाविद्यालय शाळा कृति समितिने शासनाच्या धोरणा विरोधात लढा उभारुन 4 ऑगस्ट पासून बेमुदत संप पुकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षकांनी मुंबई आझाद मैदानावर बेमुदत आंदोलनास सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

त्यामुळे फैजपुर येथील मौलाना आझाद हॉयस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षकांच्या मागण्या मान्य करून आमचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशा मागणीचे निवेदन फैजपुर प्रांताधिकारी कार्यालयाला दिले. हे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयाचे अव्वल कारकुन के.पी. चौधरी यांनी स्वीकारले या निवेदनावर विद्यार्थी प्रतिनिधी जाकी अनवर अशफाक, सानिया महमूद पिंजारी, आसिया बानो खलील पिंजारी, करम शेख मजिद शेख, इलियास मोमीन, कामरान खलील खान, शेख समीर शेख सईद यासह असंख्य विद्यार्थ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.