शिक्षकांना कधी विसरू नका

0

भाजपच्या शैला मोळक यांचे नागरिकांना आवाहन

आळंदी । शिक्षक हा सर्वोत्तम गुरु असतो. शिक्षक शालेय जीवनात मुलांच्या आयुष्यात विविध पैलू पाडू शकतो. शिक्षकांना कधी विसरू नका, असे आवाहन भाजपच्या पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा शैला मोळक यांनी केले. श्री ज्ञानेश्‍वर विद्यालयातील दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. ह. भ. प. शेंडकर महाराज, मुख्याध्यापक गोविंद यादव, पर्यवेक्षक सुर्यकांत मुंगसे, संस्थेचे सचिव अजीत वडगावकर याप्रसंगी उपस्थित होते.

शाळेला करणार सहकार्य
ज्या शिक्षण संस्थेत शिकलो त्या संस्थेला मोठे झाल्यावर मदत करा, असे आवाहन मोळक यांनी यावेळी केली. ही शाळा आय. एस. ओ. मानांकन प्राप्त व डिजिटल होत असल्याने आनंद व्यक्त करत सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तो आदर्श जपण्याचा प्रयत्न करावा. संस्कारातून चांगल्या जीवनाचा इतिहास निर्माण करा, असे अजीत वडगावकर यांनी सांगितले. मोठ्या पदावर विराजमान झाल्यावर या संस्थेला विसरू नका, असे आवाहन त्यांनी केले. निता गांधी, अनुजायिनी राजहंस व मुख्याध्यापक गोविंद यादव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यु. ए. कडलासकर तर आभार शशिकला वाघमारे यांनी मानले.