शिक्षकांना न्याय देण्याऐवजी उर्मट भाषा वापरुन हाकलले

0

धुळे। सध्या दररोज विविध निर्णयाचे फतवे काढून शिक्षणमंत्री व सचिव गोंधळाची स्थिती निर्माण करीत आहेत. शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली तर अरेरावीची उत्तरे मिळत आहेत. शिक्षण क्षेत्रातील ही अस्वस्थता व गोंधळ थांबवावा, अशी मागणी करीत महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षणाधिकारी कार्यालयाबाहेर तोंडाला काळी फित बांधून मुकआंदोलन केले. शिक्षणाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात, शासनाने 10 जुलै व 17 जुलै रोजी परिपत्रक काढून 2 मे 2012 पासून मान्यता देण्यात आलेल्या शिक्षकांच्या मान्यतेच्या चौकशीचे तसेच चौकशीअंती अनियमित असलेल्या शिक्षकांच्या वेतनाची जबाबदारी झटकली आहे. या संदर्भात शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी शिक्षण सचिव नंदकुमार यांची भेट घेतली असता त्यांनीही शिक्षकांना न्याय देण्याऐवजी उर्मट भाषा वापरुन शिष्टमंडळाला हाकलून लावले.

शिक्षणमंत्र्यांना शिक्षणक्षेत्रात स्वारस्य नाही
शिक्षणमंत्र्यांनाही शिक्षणक्षेत्रात फारसा रस नसल्याचे दिसून आले. या सर्व प्रकाराने शिक्षकवर्गात अस्वस्थता निर्माण झाली असून शिक्षण क्षेत्रात दररोज दिल्या जाणार्‍या नव्या आदेशामुळे होत असलेली गोंधळाची स्थिती थांबवावी, अशी मागणी करीत आज शिक्षणाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माध्यमिक शिक्षक संघाचे सहसचिव संजय पवार, एस.सी.पवार,डी.जे.मराठे,जे.बी.सोनवणे, हेमंत ठाकरे, आर.बी.अमृतकर, विश्‍वास पगार, एम.बी.मोरे, मनोज पाटील, आर.डी.वेंदे, एस.के.चौधरी, जे.एम.देसले, एम.एम.पाटील, डि.बी.साळुंके, विनोद रोकडे, के.एच.बोरसे, गुलाबराव वाघ, जी.एस.बोरसे, डी.सी.महाले, हेमंत भदाणे, उदय तोरवणे, डि.डी.बागुल, अश्पाक खाटीक, एस.डी.पाटील, आर.टी.पाटील, ऊर्मिला मोरे, हेमलता पाटील, बडगुजर, के.एस.पाटील आदींसह शिक्षक सहभागी झाले होते.