शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती; राज्य सरकारचा निर्णय

0

मुंबई: कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. अद्याप शाळा सुरु होण्याबाबतचे चिन्ह दिसत नाहीये. मात्र राज्यातील शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती ५० टक्के करण्याचा निर्णय हा ठाकरे सरकारने घेतला आहे. करोना आणि लॉकडाउन यामुळे राज्यातील शाळा १५ जून २०२० ला सुरु होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु करुन स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात आल्या. त्यासाठीचे निर्णय संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहमतीने घेतले गेले. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व आस्थापना टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत आता शाळांमधली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही ५० टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.