शिक्षकांनी ज्ञान अद्ययावत ठेवावे ; विद्यार्थ्यांना या ज्ञानाचा फायदा द्या

0

नवापूर । नवापूर एज्युकेशन सोसायटी संचालित विविध शाखांचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष विपीन चोखावला तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सल्लागार रमेश शाह उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष शिरीष शाह ,सचिव जीतू देसाई ,सदस्य हेमंत शाह ,फकिर अग्रवाल ,बबनराव जगदाळे, प्राचार्य संजयकुमार जाधव, मिलिंद वाघ, सिमरन दिवटे ,निलेश प्रजापती, एकता देसाई ,आसिफ शेख ,छोटा सर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक शिरिष शाह यांनी केले त्यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारामागची भूमिका स्पष्ट केली राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड झाल्याबद्दल धृतील प्रजापती व शिक्षक डी. पी. पाटील सन्मान विपीनभाई चोखावाला यांनी केला.

शिक्षकांची भूमिका स्पष्ट
संस्थेचे सदस्य हेमंत शाह, बबनराव जगदाळे यांनी ही मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी रमेश शाह यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शिक्षकांनी नेहमी अपडेट राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांना त्या ज्ञानाचा फायदा झाला पाहिजे. विविध उदाहरण देऊन त्यांनी शिक्षकांची भूमिका स्पष्ट केली. संस्थेचे अध्यक्ष विपीन चोखावाला यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असले पाहिजे.

पात्रता उंचविण्याची अपेक्षा
संस्थेच्या व शाळेच्या विकासासाठी आमची भूमिका सकारात्मक असते. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत आपणच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्वांनी आपापली पात्रता अजून उंचावावी असेही त्यांनी सांगितले पुरस्कार मिळवलेल्या शिक्षकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मराठी, गुजराती , उर्दू ,इंग्रजी माध्यमातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. गणेश लोहार ,प्रा गुफरान मणियार व निर्जला सोनवणे यांनी तर आभार बबनराव जगदाळे यांनी मानले.

हेमंत शहांनी केली घोषणा
तसेच नितीन ठाकरे व गुफरान मणियार यांनी एम. एड. पदवी मिळवल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. आदर्श पुरस्काराची घोषणा हेमंत शाह यांनी केली. यात संस्थेच्या गुजराथी विभागातून प्रा. कामिनी राणा ,मराठी विभागातून योगिता पाटील तर इंग्रजी विभागातून राजेश अहिरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला. प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.