शिक्षकांनी पारंपरिकता व आधुनिकतेची घालावी योग्य सांगड

0

वासुदेवजी शर्मा : नरेंद्र मोदी विचार मंचतर्फे 22 शिक्षकांचा गौरव

भुसावळ – आज जगात झपाट्याने बदल होत आहेत. प्रत्येक क्षेत्रात प्रगतीसाठी नवनवीन साधनांनी जागा घेतली आहे. शिक्षण क्षेत्रातही अध्ययन-अध्यापन पद्धती, मूल्यमापन, पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम यामध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. हे बदल समजावून घेऊन शिक्षकांनी पारंपरीकता व आधुनिकता या दोघांची योग्य सांगड घालून विद्यार्थीकेंद्रीत शिक्षणाला महत्त्व द्यावे, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष वासुदेवजी शर्मा यांनी येथे केले.
शहरातील चक्रधर नगरातील रोटरी भवनात नरेंद्र मोदी विचार मंच, भारत तालुकातर्फे पार पडलेल्या शिक्षक गौरव सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

व्यासपीठावर यांची उपस्थिती
व्यासपीठावर प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, मंचचे तालुकाध्यक्ष नारायण कोळी, शहराध्यक्ष संदीप सुरवाडे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविकात शहराध्यक्ष संदीप सुरवाडे यांनी सुशिक्षित व सुसंस्कारशील पिढी घडविणार्‍या शिक्षकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ अटल आदर्श शिक्षक पुरस्कार 2018 हा सोहळा आयोजित करण्यात आल्याचे सांगून मंचतर्फे यापुढे विविध उपक्रम राबवण्यात येतील, असे सांगितले.

संस्कारशील पिढी घडविण्यात शिक्षकांचे मोलाचे योगदान
रजनी सावकारे यांनी संस्कारशील पिढी घडविण्यात शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले. शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांनी शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक केले. अध्यक्षीय मनोगतात वासुदेवजी शर्मा यांनी शिक्षक आज, काल व उद्या याविषयी सांगून शिक्षकांचे कौतुक केले तसेच नरेंद्र मोदी विचार मंच करत असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी शालेय विद्यार्थीनींनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या विषयावर पथनाट्य सादर केले. बालभारती अभ्यास मंडळ, शाळासिद्धी यासह विविध राज्यस्तरीय समित्यांवर काम करून भुसावळचा नावलौकिक वाढवणारे शिक्षक डॉ. जगदीश पाटील यांचा शिक्षण सन्मान 2018 असे मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. हा गौरव डॉ. पाटील यांचे वडील ह.भ.प. लक्ष्मण महाराज यांनी स्विकारला. यानंतर शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या 21 शिक्षकांना अटल आदर्श शिक्षक पुरस्कार 2018 हा पुरस्कार स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सूत्रसंचालन रवी पाटील यांनी तर आभार भूषण कुलकर्णी यांनी मानले.

या शिक्षकांचा झाला गौरव
नयना बडगुजर, योगेश पाटील, विलास पाटील, ललित धांडे, निलीमा भंगाळे, नलिनी बाविस्कर, संजीव पाटील, प्रसन्ना बोरोले, संगीता राणे, अर्चना पाटील, आबा पाटील, हेमांगी पाटील, संदीप पाटील, पौर्णिमा फेगडे, नामदेव महाजन, मनीषा तायडे, अमित चौधरी, जगदीश शिंदे, उज्वला सुरवाडे, रवींद्र बहाळे, रीजवान खान या शिक्षकांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र मोदी विचार मंचचे किरण वाणी, पितांबर पाटील, अतुल चौधरी, अनिरुद्ध कुलकर्णी, विनीत हंबर्डीकर, देविदास चौधरी, प्रा.प्रशांत पाटील, राजश्री नेवे, रेहमान शेख, आनंद जोशी व इतर सदस्यांनी परीश्रम घेतले.