शिक्षकांनी मुलांचा अध्ययन स्तर निश्‍चित करावा!

0

शहादा । येथील चावरा स्कूलमध्ये जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली दिशादर्शक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना शिक्षणाधिकारी अरुण पाटील म्हणाले, ‘प्रत्येक मूल शिकतं, शिकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे. मूल समजून घेतलं पाहिजे. डॉ राजेंद्र कांबळे प्राचार्र्‍यांनी शिक्षकांनी मुलांचा अध्ययन स्तर निश्चित करून अध्ययन अध्यापन प्रक्रिया घडवून आणावी . शिक्षकांनी सुलभकाची भूमिका करावी. उपशिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांनी, सर्व मुलांचा मेंदू सारखाच असतो. शिकण्याच्या प्रक्रियेत व्यक्ती समाज , दारिद्र्य इ . घटक अडसर ठरत नाहीत असे स्पष्ट केले.

‘शिक्षकांची भूमिका व कार्य‘ यावर विवेचन
शहादा तालुक्यातील प्रगतशिल शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षकांची दिशादर्शक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत शहादा तालुक्यातील 257 शिक्षक मुख्याध्यापक सहभागी झाले होते. या कार्यशाळेत ‘ मूल प्रगत होण्यात येणारे अडसर ‘ या विषयावर मार्गदर्शन करुन करावयाचे गटकार्य करण्यासाठी केन्द्र प्रमुख ललिता भामरे यांनी शिक्षकांचे गट तयार करुन चर्चा घडवून आणली. गटप्रमुखाने गटकार्याचे सादरीकरण करण्यात आले. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत येणार्‍या अडचणी सोडविण्याचे पर्याय प्रा डॉ गिरीश बोरसे यांनी स्पष्ट केले. गटशिक्षणाधिकारी उषा पेंढारकर यांनी शाळा, तालुका प्रगत करण्यासाठी शिक्षकांची भूमिका व कार्य या विषयावर विवेचन केले. यावेळी शिविअ डी. डी. राजपूत, एम. आर. निकुम, केन्द्र प्रमुख नरेंद्र महिरे, रतिलाल खर्डे , दशरथ वायकर, मोहन बिस्नारिया , लक्ष्मण परदेशी , साधन व्यक्ती संदिप पाटील, राजेश्वर पवार , मनोज खैरनार, अलका बागले, वैशाली साळुंके आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन नरेंद्र महिरे यांनी तर आभार रतिलाल खर्डे यांनी मानले.