शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

0

प्रांताधिकारी विक्रमसिंग बांदल यांच्याकडे धनादेश सुपूर्द
शिरपूर:शिरपूर-वरवाडे नगर परिषद संचालित पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूलचे शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी आपल्या एक दिवसाचा पगार 1 लाख 30 हजार 316 रुपयाचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला आहे. त्या रकमेचा धनादेश माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रमसिंह बादल यांच्याकडे सपूर्द करण्यात आला.

माध्यमिक विभागाकडून 1 लाख 12 हजार 973 रुपये आणि उच्च माध्यमिक विभागाकडून 17 हजार 343 रुपये असे 1 लाख 30 हजार 316 रुपयाची रक्कम जमा करण्यात आली. या रकमेचा धनादेश कोरोना संकट मदत निधीसाठी उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रमसिंह बादल यांच्याकडे तहसीलदार आबा महाजन, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अमोल बागुल, हेमंत पाटील, श्यामकांत ईशी, मुख्याध्यापक आर.आर. पाटील, शाळा अधीक्षक जितेंद्र जाधव यांच्या उपस्थितीत शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेचे शिक्षण समिती सदस्य प्रभाकरराव चव्हाण यांच्या हस्ते सपुर्द करण्यात आला.
सध्या संपूर्ण महाराष्ट्र कोरोना संकटाशी झुंजत आहे. अशा संकटकाळात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना मदतीसाठी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यालयातील सर्व कर्मचार्‍यांनी आपल्या एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केला. निधी गोळा करण्याबाबत उपमुख्याध्यापक के.पी.कुलकर्णी, पर्यवेक्षक ए.एस.कानडे, के.एन.काजी, एम.एम.बैसाणे, निलेश गुजर यांनी परिश्रम घेतले.