जळगावच्या पी.एम.मुंदडे विद्यालयातील प्रकार ; पाच हजारांची मागणी भोवली
जळगाव- शहरातील पी.एम.मुंदडे विद्यालयातील मुख्याध्यापकासह लिपिका शिक्षकाकडूनच पाच हजारांची लाच मागणे भोवले असून दोघा आरोपींच्या जळगाव एसीबीने गुरूवारी सायंकाळी मुसक्या आवळल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. भरत धुडकु पाटील (57, रा.शिवराणा नगर,गुजराल पेट्रोलपंपाजवळ,पिंप्राळा, जळगाव) व लिपिक संजय श्रीकृष्ण कुलकर्णी (51, श्री मंगलमूर्ती नगर,पिंप्राळा, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.