शिक्षकाकडून मुलींवर लैंगिक अत्याचार

1

अमळनेर । तालुक्यातील कळमसरे येथील जि.प.शाळेतील संशयीत शिक्षक जगदीश भास्कर पाटील (वय-40) याने अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर विद्यार्थिनीं सोबत अश्‍लीलचाळे करीत मुलींना दमदाटी करत माझा भाऊ पोलिस अधिकारी आहे. माझे कुणीही काही करू शकत नाही, मी कुणाला घाबरत नाही. विद्यार्थिनीं झालेला प्रकार घरी पालकांना सांगितला असता अनेक पालकांनी पोलिसात धाव घेताली असून शिक्षक रजा टाकून फरार झाला आहे. डीवायएसपी शेख हे घटनास्थळी जाऊन माहीती जाणून घेत अमळनेर पोलिस स्थानकात विद्यार्थिनींची इन कॅमेरा जबाब घेतले जात असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.