शिक्षकाचा सन्मान केला पाहिजे : आढळराव पाटील

0

जुन्नर । शिक्षक दिनीच शिक्षकाचा सन्मान केला पाहिजे. शिक्षक पुरस्कार आचारसंहितेच्या कारणामुळे अडचणीत आणू नयेत. राजकीय हस्तक्षेपामुळे शिक्षक तणावाखाली असतात. त्याचा गंभीर परिणाम होतो. जिल्हा परिषदेने या पुरस्कारासाठी तरतूद करावी, असे मत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

जुन्नर पंचायत समितीच्या वतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार शरद सोनवणे, आशा बुचके, शरद लेंडे, सभापती ललिता चव्हाण, अरुण गिरे, गटविकास अधिकारी सतिष गाढवे, गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ व इतर मान्यवर उपस्थित होते. जुन्नर तालुका शैक्षणिक गुणवत्तेत आघाडीवर आहे. भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत आहेत. त्याच्या प्रश्‍नांबाबत सर्वांनी त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे, असे आढळराव पाटील यांनी सांगितले. गटशिक्षणाधिकारी के. डी भुजबळ यांच्या कामकाजाचे कौतूक करून जि. प. सदस्या आशा बुचके यांनी समाधान व्यक्त केले.